About us

'सायन' चे प्रत्येक पुस्तक ज्ञान आणि ज्ञानियांच्या समृद्ध कुटुंबाचे वारसदारच ठरावे.

Scion Publications

सायन (SCION) हा मुळातला इंग्रजी शब्द सायनचे दोन अर्थ होतात प्रतिष्ठित कुटुंबाचा तरुण सभासद... वारसदार म्हणजे सायन या अर्थाने सायनचे प्रत्येक पुस्तक ज्ञान आणि ज्ञानियांच्या समृद्ध कुटुंबाचे वारसदारच ठरावे.
सायनचा दुसरा अर्थ म्हणजे अनेक प्रकारची फुले एकाच झाडावर येण्यासाठी केले जाणारे कलम. सायनच्या वृक्षावर अशीच बहुरंगी पुस्तकफुले बहरून येण्यासाठी हे सर्व परिश्रम.

सायन पब्लिकेशन्स प्रा.लि. ही प्रकाशनसंस्था आपल्या दर्जेदार पुस्तकांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशझोतात आहे. उत्तम दर्जाच्या मराठी पुस्तकांबरोबर आम्ही आजवर इंग्रजी पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. लवकरच हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये 'सायन'तर्फे पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. साहित्य, सामान्यज्ञान, विज्ञान, व्यक्तिमत्व विकास आणि जीवनोपयोगी विषयांवरची; तसेच बालकुमार साहित्य ही आमची प्रकाशन-क्षेत्रे आहेत. विविध संस्थांबरोबर प्रकाशन-प्रकल्प राबवणे हेही आमच्या प्रकाशनाचे एक महत्त्वाचे वैशिट्य म्हणावे लागेल. 'मुंबई विद्यापीठ' आणि 'मुकुंदराव पाटील स्मारक समिती' अशा काही महत्त्वाच्या संस्थांबरोबर आमचे प्रकाशन-प्रकल्प सुरू आहेत. अभ्यासू संपादकीय विभाग आणि वाचनसंस्कृती वाढीस लागावी, तसेच पुस्तके सर्व वाचकांपर्यंत विनासायास पोचावीत या ध्येयाने प्रेरित असणारा विक्री विभाग आणि सर्वदूर असणारी वितरणव्यवस्था ही आमची बलस्थाने आहेत. नवनवीन कल्पना आणि नवीन उमदे लेखक यांच्यासाठी सायन महत्त्वाचे व्यासपीठ तर ठरले आहेच पण त्याचबरोबर परंपरांच्या सीमा विस्तारत नेण्याचे कार्यही आपसूकच घडत आहे. म्हणूनच सर्व नवीन आणि उमद्या तरुण लेखकांचे आणि कल्पनांचे या व्यासपीठावर सदैव स्वागतच आहे.

The Young Member of a Rich and Prestigious Family. Every Scion Book be the torchbearer of the Rich and Pretigious family of books and knowledge.

Scion Publications Pvt.Ltd. is multilingual publishing house having its head office in Pune, Maharashtra State (India). With a major focus on Marathi and English books, Scion is expanding its publishing territory in Hindi as well as other Indian regional languages. Literature, General Science, Self-help and Personality Development books and childerns books are the areas of publishing for us. Joint ventuers and co-publishing programmes are special features of our publishing house. As a part of this, we have joint publishing programmes with prestigious educational institutions like Mumbai Univerity and Mukundrao Patil Smarak Samiti.

Reourceful Editoria Department and strong Marketing and Sales team as well as national and regional network are our strong features.

Transcending the traditions with new and novel ideas of young and new writers is our mission. Scion has proved a great platform for new writers having genius and extraordinary ideas. Hense, new authors and new ideas are always welcome on the Scion Platform.

Scion Publications

Address: Scion Publication Pvt. Ltd.
3rd Floor, Swojas House 1159,
Sadashiv Peth Near
Hatti Ganapati Pune- 411030

Phone No.: Tel(Fax): 020/24476954

Email-ID: scionpublications@rediffmail.com


Scroll To Top