विरक्त फुलपाखरे – बालम केतकर – २०० रु. ISBN : 978-93-81351-85 -7
बालम केतकरांच्या कवितेत सृष्टीतल्या सगळ्या माणसांचे आंतरिक आणि बाह्य व्यवहारीसुद्धा जगणे सापडते, हे या कवितेचे जबर वैशिष्टय आहे.
लाइक द फ्लोइंग रिव्हर - पाऊलो कोएलो – २२५ रु. – ISBN : 978-93-81351-00-0
विविध जीवनदर्शने घडविणारे हे ललित लेखन व लघुकथा कधी तुम्हाला खळखळून हसवतात तर कधी गंभीर बनवतात.
उद्याच्या सुंदर दिवसांसाठी - नागनाथ कोत्तापल्ले – २०० रु. – ISBN : 978-93-81351-05-5
विचारांचे पक्के अधिष्ठान असलेले हे लेखन वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. कथात्मक रूप घेणारे वेगळ्या शैलीचे ललित गद्य.
सत्याच्या वाटेवर – बी. जी. वाघ – १९० रु. – ISBN : 978-93-81351-98-7
एखादं मांजर जसं उंदराच्या शोधात असतं, तसा माणूस सुखाच्या शोधात असतो. मांजराचा शोध उंदीर मिळाल्यावर संपतो. माणूस सुख मिळाल्यावरही ते अनंतकाळ आपल्या मुठीत राहावे म्हणून धडपडत असतो.
जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य – संपादक : प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. दत्ता भगत – ISBN : 978-93-81351-88-8मराठी लेखकांनी जागतिकीकरणाला दिलेला प्रतिसाद आणि त्यामुळे विविध साहित्य प्रवाहांनी धारण केलेले रूप याचा विचार याग्रंथात करण्यात आलेला आहे.
चंदनाचे पाय - अजित पाटील – १४० रु. – ISBN : 978-93-81351-35-2
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्यांच्या नातवाच्या निरागस बाळदृष्टीतून साकारलेले अनोखे चरीत्र.
पोइंट ब्लांक (Point Blank) – काशिनाथ मिसाळ – ३८० रु. – ISBN : 978-93-81351-89-5
आजूबाजूला खूप घाण असतानाही आपण स्वच्छ राहणे अवघड असते. त्यासाठी आई-वडील आणि कुटुंबाचे संस्कार महत्वाचेच असतात. भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची आत्मकथा.
शेतमळा ते विधानसभा – पांडुरंग अभंग – २०० रु. – ISBN : 978-93-81351-91-8
आमदार म्हणून निवडून येऊनही आपण सामान्य कार्यकर्ते आहोत, याचे त्यांचे भान शेवटपर्यंत सुटत नाही. त्यांच्या प्रामाणिक वृत्तीमुळेच ते मोठी झेप घेऊ शकले. अश्या सामान्यांतल्या असामान्य नेत्याची आत्मकथा.
नाटक कालचं आणि आजचं – पुष्पलता राजापुरे – तापस – ISBN : 978-93-81351-03-1
संहिता विचार आणि प्रयोग विचार यांच्या अनुषंगाने नाट्यासंबंधीच्या आकलनकक्षा रुंदावणारे पुस्तक.
भाषासंवाद – अनिल गवळी, नंदकुमार मोरे – २५० रु. – ISBN : 978-93-81351-23-9
भाषेचा नव्या दृष्टिकोनातून विचार करणारा आणि भाषाभ्यासाच्या क्षेत्रात मौलिक भर टाकणारा ग्रंथ.
मनमोकळे आणि रोखठोक - नागनाथ कोत्तापल्ले – २३० रु. – ISBN : 978-93-81351-49-9
महाराष्ट्रातील सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक साहित्य विषयक चळवळीच्या महत्वाच्या पैलूंचा लेखाजोखा म्हणजे नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मुलाखतींचे हे पुस्तक.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – १ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. ISBN : 978-93-81351-50-5
स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – २ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. – ISBN : 978-93-81351-51-2
स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
संत साहित्यातील मिथकांचे रहस्य – डॉ. कल्पलता नातू – ३५० रु. – ISBN : 978-93-81351-52-9
सृष्टीतील चमत्कारांचे गूढ उकलण्यासाठी मानवाने रचलेल्या कल्पनारम्य कथांचा या पुस्तकातील अभ्यास मिथक ही संकल्पना सर्वसमावेशक कशी आहे हे स्पष्ट करतो.
संत तुकारामांचे आत्मवृत्त - नागनाथ कोत्तापल्ले – २५० रु. – ISBN : 978-93-81351-68-0
गाथेत विखुरलेल्या अभंगांतून आत्मचरीत्रपर अभंग निवडून त्यांची तुकाराम चरीत्रातील घटनाक्रमानुसार फेरमांडणी करून संत तुकारामांचे जीवन आणि आध्यात्म आपल्यासमोर साक्षात करणारे चरित्र.
संत एकनाथांची अभंगवाणी :एक दृष्टिक्षेप – डॉ. यशवंत साधु – २३० रु. – ISBN : 978-93-81351-76-5
अनुभूतिशून्य, भक्तीविहीन, पांडित्याविरुद्ध नाथांनी बंडखोरी केली. नाथांच्या अभंगवाणीचा फार मोठा भाग या प्रबोधनपर साहित्याने व्यापलाआहे.
सर्वात्मभावी तुकाराम – डॉ. अनिल गवळी – १९० रु. – ISBN : 978-93-81351-75-8
तुकारामांच्या प्रतिमा आपल्यासमोर येताना भावनेबरोबर विचार घेऊन येतात हे महत्वाचे.
अपार्थिवाचे गाणे - नागनाथ कोत्तापल्ले – २०० रु. – ISBN : 978-93-81351-83-3
जीवनातील दंभाचा, खोटया गोष्टींचा ज्ञानेश्वरांनी प्रच्छन्न उपहास केला आहे. षड्विकारांचा त्याग केला पाहिजे असे ते सांगतात.
अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा - प्रल्हाद लुलेकर – २५० रु. – ISBN : 978-81-905991-5-3
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्याच घटकांना केंद्रस्थानी आणून एका नव्या एकात्म भारताचे स्वप्न पहिले. परंतु व्यवस्थेने त्यांना फक्त दलितांचे कैवारी ठरविले. या दु:खाची बोचणी लागून लिहिला गेलेला आगळा वेगळा ग्रंथ.
सफाई देवता – ओमप्रकाश वाल्मिकी – अनुवाद : डॉ. साताप्पा सावंत – ISBN : 978-81-905991-0-1
भंगी समाजाच्या परिस्थितीचा घेतलेला ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय आढावा.
ज्योतिपर्व - नागनाथ कोत्तापल्ले – २८० रु. – ISBN : 978-93-81351-70-3
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या तसेच कृष्णराव भालेकर, ताराबाई शिंदे आणि कर्मवीर वि. रा. शिंदे या ज्योतिपर्वाला अर्थपूर्ण करणाऱ्या विचारवंतांच्या कार्याचा आणि विचारांचा वेध घेणारा महत्वाचा ग्रंथ.
स्त्री-पुरुष तुलना - ताराबाई शिंदे – संपादन : नागनाथ कोत्तापल्ले – १०० रु. – ISBN : 978-93-81351-71-0
स्त्रीवादी भूमिकेचा जागतिक स्तरावर एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच पाया घालणारा हा छोटेखानी ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एकअक्षरलेणेच.