डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यासाठी पोषणभूमी ठरलेल्या काळातील आणि 1891 ते 1960 या बाबासाहेबांच्या कार्यकाळातील घटनांच्या नोंदीच्या आधारे साकार केलेले नोंदींच्या स्वरूपातील बाबासाहेबांचे चरित्र.
लतादीदींच्या सुरांचं अलौकिक आध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत लीलया पोहोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसह्य करतील, कडोविकडीच्या प्रसंगी आपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत जीवनसन्मुख करतील.
सरंजामी मानसिकता आणि आधुनिक विचारांचा संघर्ष , स्वातंत्र्यसंग्राम आणि स्वातंत्र्योत्तर काळ यांच्या पार्श्वभूमीवर सत्योत्तर सत्याचा वेध घेणारी, भविष्यकालीन वर्तमानाचे सूचन करणारी कादंबरी.
चमत्कार आणि बाबा बुवा यांचे वाढत चाललेले प्रस्थ पाहून अस्वस्थ झालेल्या संवेदनशील तरुण शिक्षकाच्या बहुआयामी संघर्षाची चित्रण करणारी कादंबरी "काया वाचा मने" सुनील यावलीकर.